सीकेटीत विज्ञान प्रदर्शन आणि संविधान दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त
सीकेटी विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भव्य विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील नावीन्यपूर्ण प्रकल्प या वेळी इ. पाचवी ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागावा, तसेच कल्पना शक्तीला वाव मिळावा म्हणून असे प्रदर्शन दरवर्षी विद्यालयात भरवले जाते. या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अजित केळकर व सचिव प्रगती पाटील, तसेच सीकेटी संकुलातील सर्व विभागप्रमुख,़ इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षिका निरजा मॅडम, तसेच विज्ञान शिक्षक उपस्थित होते. उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षक स्मिता नाईक व दिनेश पवार यांनी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण केले. या वेळी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन असल्यामुळे विद्यार्थ्यांना संविधानाचा सन्मान राखण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे शपथ देण्यात आली. संविधानाशी निगडित घोषवाक्यांच्या जोरदार घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी खर्या अर्थाने संविधान दिन साजरा केला.
उरण येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
उरण : वार्ताहर
येथील बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र. 843 व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 26) 70 वा संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. या वेळी बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र. 843चे अध्यक्ष प्रकाश कांबळे, चिटणीस विजय पवार, रोशन गाडे, खजिनदार अनंत जाधव, सुरेश गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल कासारे, विनोद कांबळे, विकास कांबळे, अमर गायकवाड, बौद्धाचार्य महेंद्र साळवी, अजय कवडे, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता सपकाळे, सविता साळवी, गीता कांबळे आदी उपस्थित होते. संविधान दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन गाडे यांनी केले.