पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील उलवे सेक्टर 20 येथे शिवराज शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ उलवे यांच्या वतीने श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा यानिमित्त चित्रकला स्पर्धा आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याचप्रमाणे उलवे सेक्टर 5 येथे शिवसह्याद्री मित्र मंडळ यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयजीत करण्यात आला होता. या सोहळ्याला हितेश शिंगारे, संदीप साळुंखे, भाजप उलवे नोड -1 उपाध्यक्ष विशाल म्हात्रे, अध्यक्ष अमोल चव्हाण, उपाध्यक्ष अजय पवार, खजिनदार अजित चोरगे, सचिव राहुल घोलप संदेश साळुंखे, हितेश शिंगारे, संतोष शिंदे, अमोल कदम, विजय गडाख, गणेश नागले, सचिन बोर्हाडे, विशाल म्हात्रे, सुहास भोसले, विवेक बनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper