
पनवेल : रामप्रहर वृत्त
तारा येथील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित दीपोत्सव 2019 या कार्यक्रमाचे आयोजन अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि युसूफ मेहेरअली सेंटर तारा यांच्या वतीने तारा तेथील भानूबेन प्रवीण शहा हायस्कूलच्या हॉलमध्ये रविवारी (दि. 24) करण्यात आले होते. या कार्यक्रमात गीत, संगीत आणि नृत्य यांचा अनोखा संगम असलेला ‘करू या मज्जाच मजा’ हा प्रत्येक क्षणाची उत्कंठा वाढविणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कामगार नेते संतोष घरत, डॉ. स्नेहा देशपांडे, उद्योजक रमेश सोनावणे, डॉ. के. बशीर, प्रा. फातिमा मुजावर, उद्योजक नजमूल हुसेन मुजावर, उद्योजक प्रीती पटेल, अमेय परब, महादेव गायकर, उद्योजक अमेय परब, अमित शहासने यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी युसुफ मेहरअली सेंटरचे बाळकृष्ण सांवत, अनिल विश्वकर्मा, रेक्टर उत्पल्ला म्हात्रे, मुख्याध्यापक रत्नाकर भोईर, अर्चना ट्रस्टचे श्री. म्हात्रे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन संस्थापक एन. डी. खान आणि सचिव सलमा खान यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मधु निमकर आणि एच. एन. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ‘अमरदीप’च्या सर्व सदस्यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे दीपोत्सव 2019 हा कार्यक्रम यशस्वी झाला.