पनवेल : येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारताचा संविधान दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा पनवेल महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर आदी उपस्थित होते.
खांदा कॉलनी येथील मैदानात खांदेश्वर कोकण महोत्सव
खांदा कॉलनी : भाजप पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव खांदा कॉलनी येथील मैदानात सुरू आहे. या महोत्सवात सोमवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला नगरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका सीता पाटील, सरचिटणीस अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
पनवेल : भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.