Breaking News

बीएससी 1990 ग्रुपचे स्नेहसंमेलन

पनवेल : वार्ताहर

येथील एएससी (आताचे एमपीएएसी) कॉलेजमधील बीएससी 1990 ग्रुपचे स्नेहसंमेलन जेएनपीटी टाऊनशिपमधील मल्टिपर्पज हॉल येथे नुकतेच झाले.

या वेळी आशिष चौबळ यांची कविता, गाणी याचबरोबर या ग्रुपमधील हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा पन्नाशीनंतरचे आयुष्य यावर कार्यक्रम झाला. 50 वर्षे पूर्ण झालेल्यांना सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आल्या. या वर्षात ग्रुपमधील उल्लेखनीय यश संपादन करणारे अनिल ठकेकर व संजीवन म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले.

ग्रुपकडून महात्मा फुले कॉलेजचे प्रा. प्रफुल्ल वशेणीकर यांना 25 हजार रुपयांचा चेक देण्यात आला. या स्नेहसंमेलनाला 65 मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. या सर्वांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम ग्रुप अ‍ॅडमिन आर. सी. म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उरण ग्रुपने विशेष मेहनत घेतली. सायंकाळ झाल्यावर सर्वांनी पुढील वर्षी स्नेहसंमेलनाला भेटण्याचे वचन एकमेकांना दिले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply