Breaking News

सचिन तेंडुलकरची खारघरमध्ये उपस्थिती

हृदय शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना प्रमाणपत्र वितरण

पनवेल : प्रतिनिधी

सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिएक स्कील्सच्या खारघर येथील युनिटतर्फे मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या 100 मुलांना गिफ्ट ऑफ लाइफचे प्रमाणपत्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) देण्यात आले. संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

या संस्थेच्या अनेक शाखा असून, त्या माध्यमातून देशातील 10 हजार मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. खारघर येथे आतापर्यंत 7500 मुले आणि 550 गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे, तर खारघर येथील युनिटने वर्षभरात 100 मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती या संस्थेचे काम हाताळणारे श्री सत्य साई हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी या वेळी दिली. 

या सोहळ्यास संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा, गायक हरिहरन, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांच्यासह सेंटर व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply