Breaking News

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे संविधान दिन साजरा

पनवेल : वार्ताहर

बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या शाखांमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.  बँकेच्या  वाशीस्थित शाखेत व अंचल कार्यालयातही संविधान दिन साजरा झाला.

या कार्यक्रमास बँकेचे मुख्य प्रबंधक दत्तात्रय कावेरी, ज्योती बाडकर, नीलिमा खोपकर, नीलम कारमे, नमिता मेश्राम, अरविंद मोरे, गोपीचंद पाटेकर, निधी शर्मा आदी उपस्थित होते. या वेळी मोरे म्हणाले की, संपूर्ण विश्वात भारताचे संविधान सर्वांत मोठे आहे. या संविधानामुळे आपणास विविध अधिकार मिळाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परिश्रम घेऊन ही अनमोल देण सर्व भारतीयांना दिली. बाडकर, मेश्राम, पाटेकर यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्रमोद चन्ने, गुरुनाथ पवार, सुमित सिंग, पुनीत वाढेर, सी. टी. जाधव, ज्योती घाडगे, श्रीजा मिश्रा, निलेश कांबळे, वैभव मुळे, पूनम भारते, पूजा हेडाऊ, अनुश्रुती किशोर, नीला म्हात्रे, खुशबू तिवारी, आनंद गुरव, संतोष वंजारे, सतीश पारधे आदी कर्मचारी-अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply