Breaking News

डॉ. मोहन दोसी यांना ‘सेवाश्री’ पुरस्कार

माणगाव : प्रतिनिधी

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल माणगाव येथील येथील डॉ. मोहन दोसी यांना सांगली येथील बिझनेस एक्सप्रेस व श्री फौंडेशनतर्फे बिझनेस एक्सप्रेस सेवाश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

सांगली येथील विष्णू भावे नाटय मंदिरात 16 मार्चला होणार्‍या कार्यक्रमात डॉ. दोसी यांना हा पुरस्कार समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वैद्यकीय व्यवसाय करत असताना डॉ. दोसी गेली 40 वर्षे अन्यायाविरूद्ध  लढत आहेत. अनेक दैनिकांचे प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी माणगाव व परिसरातील समस्यांना वाचा फोडली.

पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलतर्फे डॉ. संजय ओक यांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार देवुन डॉ. दोसी यांना सन्मानीत केले होते. पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास संस्थेने विशेष पुरस्कार देवुन त्यांचा गौरव केला आहे.

रायगड जिल्हा पत्रकार संघाने उत्कृष्ट वार्ताहार म्हणून डॉ. दोसी यांना गौरविले आहे.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply