Breaking News

मुलभूत नागरी सुविधांसाठी वार्षिक बजेटमध्ये भरीव तरतूद

मुरूड नगरपरिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

मुरुड : प्रतिनिधी

कोणतीही करवाढ नसलेल्या मुरुड नगर परिषदेच्या 2019-20 या वर्षाच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली असून, त्यात नागरिकांना जास्तीतजास्त नागरी सुविधा पुरविण्यासाठी  मोठ्या रक्कमेच्या तरतुद करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी बुधवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत दिली.

मुरुड नगर परिषदेचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर करण्यात आला. त्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा पाटील बोलत होत्या. यावेळी नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती प्रमोद भायदे, पर्यटन व नियोजन सभापती पांडुरंग आरेकर, गटनेत्या मुग्धा जोशी, सहाय्य्क लेखापाल किरण शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

या अंदाज पत्रकात नगर परिषद कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी लागणार्‍या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाकरिता 40 लाख 10 हजार रुपयांची तर बांधकाम विभागासाठी 91 लाख 50 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या स्वच्छता अभियान तसेच जंतुनाशके, किटा खरेदी करणे, मोकाट गुरे पकडणे, घनकचरा व्यवस्थापन आदींच्या महत्वाच्या कामांसाठी एकून दोन कोटी 24 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला बालकल्याण, अपंग निधी, दुर्बल घटक यांच्यासाठी तीन लाख 25 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले.

नगर परिषदेचे एकून महसुली उत्पन्न 5 कोटी 25 लाख रुपये आहे. यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी, नगर परिषदेस मिळणारे अनुदान, वाहन प्रवेश स्वच्छता फी यांचा समावेश असल्याचे नगराध्यक्षा म्हणाल्या. सदरचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजुर केल्याबद्दल नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानले.

नगर परिषदेने भांडवली जमेमध्ये 4 कोटी 74 लाख तरतूद केली आहे. यामध्ये रस्ता अनुदान, स्वछ भारत अनुदान, 14 वा वित्त आयोग, दलित वस्ती आदींचा समावेश असल्याची माहिती नगर परिषदेचे सहाय्य्क लेखापाल किरण शहा यांनी पत्रकारांना दिली.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply