Breaking News

पनवेल व मोहो येथे विद्यार्थ्यांना वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोहो गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याचप्रमाणे पनवेल एसटी स्टँडजवळ असलेल्या श्री गुरुलिंगेश्वर मराठी प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजनही सोमवारी करण्यात आले होते. या वेळी भाजपचे प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर उपस्थित होते. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील मोहो गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत व पनवेलमधील श्री गुरुलिंगेश्वर मराठी प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. या वेळी मोहो गावातील कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच अशोक पवार, उपसरपंच संतोष शेळके, प्रवीण म्हात्रे, चाहु शेठ, किशोेर सुरते, शांताराम पाटील उपस्थित होते, तर पनवेलमधील श्री गुरुलिंगेश्वर स्कूलमध्ये रावसाहेब खरात, जरीना शेख, सोनाली महाडिक, राहुल वाहुळकर, राजू झिरे, योगेश पाटील, हर्षद कोळी, प्रवीण शिलवंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होेते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply