Breaking News

…म्हणून द्रविड आयपीएलवर नाराज

लखनऊ : वृत्तसंस्था

आयपीएलचा आगामी हंगामाचा लिलाव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव होणार आहे, मात्र भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविड आयपीएलवर नाराज आहे. भारतीय प्रशिक्षकांना संधी न देऊन आयपीएलचे संघ चूक करीत असल्याचे द्रविडने म्हटले आहे.

राहुल द्रविड लखनऊमध्ये 19 वर्षांखालील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका पाहण्यासाठी आला आहे. त्या वेळी त्याने आयपीएलविषयी मत व्यक्त केले. द्रविड म्हणाला, आपल्याकडेही काही उत्तम प्रशिक्षक आहेत. त्यांच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपले क्रिकेट आणि प्रशिक्षक प्रतिभासंपन्न आहेत, मात्र आपल्या प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये सहायक प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली जात नाही याचे मला वाईट वाटते, असे सांगून आपल्या प्रशिक्षकांचा आत्मविश्वास वाढवण्याची नितांत गरज आहे, असेही द्रविडने नमूद केले.

आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू मोठ्या संख्येने खेळतात. स्थानिक प्रशिक्षक असल्याचा फायदा त्यांना होतो. त्यांना भारतीय खेळाडूंमधील क्षमता माहीत आहे, असेही द्रविडने सांगितले. राहुल द्रविड याने वयचोरी, मैदानातील माळ्यांची मेहनत, कार्यालयीन क्रिकेट, रणजी स्पर्धा, कसोटींचे महत्त्व अशा अनेक मुद्द्यांवर कायम स्पष्ट भूमिका मांडली आहे. नुकत्याच झालेल्या डे-नाइट कसोटी सामन्याविषयीही त्याने भाष्य केले होते. आता त्याने आयपीएल प्रशिक्षकाबाबत मत मांडले.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply