Sunday , October 1 2023
Breaking News

पनवेल अध्यापक महाविद्यालय क्रीडा महोत्सवात अव्वल

पनवेल : रामप्रहर वृत्त

अध्यापक छात्राध्यापकांसाठी रायगड जिल्हा व नवी मुंबई अंतर्गत क्रीडा महोत्सवाचे आयोजन घणसोली येथील एस. के. बी.एड्. महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये  पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला. 

क्रीडा महोत्सवात पनवेल शासकीय अध्यापक महाविद्यालय, डी. डी. विसपुते बी. एड्. पनवेल, एच. बी. बी. एड्. वाशी, अंजुमन बी. एड्. वाशी, ओरिएंटल बी. एड्. वाशी, एम. सी. टी. बी. एड्. ऐरोली व एस. के. बी. एड्. घणसोली अशा एकूण सात महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुरुष आणि महिलांसाठी खो खो, कबड्डी, रिले, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, भालाफेक, गोळाफेक, हॉलीबॉल, थ्रो बॉल, गोटी चमचा, बुक बॅलन्स, थाळीफेक अशा अनेकविध खेळांच्या स्पर्धा रंगल्या.

क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास सुप्रसिद्ध बास्केटबॉल मार्गदर्शक अल्विन डिसूजा, टिळक एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि संचालक अरुण कुरूप, राष्ट्रीय व खेलो इंडिया कबड्डीपटू तेजस कदम व सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात पनवेल शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खो खो, धावणे, रिले, हॉलीबॉल, कबड्डी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक यात सर्वांत जास्त पारितोषिके प्राप्त केली. समारोप कार्यक्रमासाठी अरुण कुरूप, अनिल नायर, शुभम वनमाळी, प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. या यशाबद्दल पनवेल कॉलेजच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले यांनी विद्यार्थी व क्रीडाप्रमुख डॉ. नीलिमा मोरे यांचे अभिनंदन केले.

Check Also

शूटिंगबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर स्कूलचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक …

Leave a Reply