Breaking News

सावळे येथे विविध योजनांचा शुभारंभ व विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सावळे ग्रामपंचायत ग्रामनिधी अंतर्गत विविध योजनांचा शुभारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी (दि. 13) झाला. या कार्यक्रमास उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सावळे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी अंतर्गत स्वर्गीय शंकर कानू केदारी दिव्यांग सन्मान योजना आणि स्वर्गीय नामदेव विठु माळी ज्येेष्ठ नागरिक सन्मान योजना या योजनांचा शुभारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमास सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी माळी, उपसरपंच अमृता म्हस्कर, सदस्या सुजाता माळी, छाया केदारी, ज्योती केदारी, माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, संतोष माळी, माजी उपसरपंच संदिप भोईर, अश्विनी करंगुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply