पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकचे नगरसेवक आणि भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांच्या मातोश्री हिराबाई चंदर बिनेदार यांचे शनिवारी (दि. 30) पहाटे 5 वाजता नवीन पनवेल येथे वृद्धत्वाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनाला जाण्यापूर्वी हिराबाई बिनेदार यांचे अंत्यदर्शन घेतले आणि बिनेदार कुटुंबीयांचे सांत्वन केले. हिराबाई यांच्या पार्थिवावर पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका वृषाली वाघमारे, जितेंद्र वाघमारे, जगदिश घरत, सी. सी. भगत यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.