Breaking News

डॉ. प्रियांका रेड्डी हत्येप्रकरणी आज उरणमध्ये निदर्शने

उरण ः रामप्रहर वृत्त

डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी उरणमध्ये महिलांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. डॉक्टर प्रियांका रेड्डी या कामावरून परतत होत्या आणि त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या स्कूटरचे टायर पंक्चर झाले होते. त्याचवेळी काही इसमांनी त्यांना टायर पंक्चर असून पुढे जाणे शक्य नसल्याचे सांगितले. बहीण भावना यांनी प्रियांका रेडींना टोलनाक्यावर थांबण्यास सांगितले, परंतु एकटे थांबणे बरोबर नाही असे प्रियांका म्हणाल्या आणि निघाल्या. त्याच वेळेस त्यांना एका इसमाने थांबविले आणि सगळी दुकाने बंद आहेत. एक मुलगा येऊन पंक्चर काढून देईल असे सांगितले. ती मंडळी शंकास्पद असल्याचे देखील प्रियांका यांनी बहिणीला सांगितले होते. रात्री 9.44 वाजता प्रियांका यांचा फोन स्विचऑफ लागल्याने त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी प्रियांका यांची बॉडी पूर्ण जळालेल्या अवस्थेत सापडली आणि सामूहिक बलात्कार झाल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. ह्रदयाचा थरकाप उडवणारी आणि काळीज पिळवटून काढणारी ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते. या विकृत कृत्यांना कधी आळा बसणार याचे उत्तरच कोणाकडे नसल्याचे दिसते आहे. अशा नराधमांना कडक शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ.प्रियांका रेड्डी हिच्यावर  बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. या क्रूर घटनेचा सर्व देशभर निषेध होत नराधमांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. आज 2 डिसेंबर 2019 रोजी उरण गांधी चौक येथे सायंकाळी 4वा. उरण महिलांच्या वतीने निदर्शने आयोजित केली आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply