Breaking News

जागतिक एड्स पंधरवडानिमित्त भव्य रॅली

अलिबाग ः प्रतिनिधी

जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त आयोजित रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संदीप वीरभद्र स्वामी, लायन्स क्लब अध्यक्ष अंकित बंगेरा व चित्रलेखा पाटील, लायन्स क्लबच्या निहा राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग संजय माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

रॅलीच्या सुरुवातीला जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत आयोजित सेल्फी पॉइंटचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रांगणात होऊन सदरची रॅली एसटी स्टॅण्ड, शिवाजी पुतळा, बालाजी नाकामार्गे पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत नेण्यात आली. रॅलीमध्ये उपस्थित युवक-युवतींना एचआयव्ही, एड्सविषयी शपथ देण्यात आली.  या रॅलीमध्ये नर्सिंग स्कूल,  जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, जे. एस. एम. कॉलेज अलिबाग, पी. एन. पी. कॉलेज वेश्वी अलिबाग तसेच लायन्स क्लब श्रीबाग यांचे सर्व अधिकारी व पदाधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. रॅली यशस्वी होण्यासाठी गिरीश म्हात्रे, गौरी म्हात्रे, हर्षद घरत, नेहा घरत, संतोष साखरे, बाबासाहेब चौगुले, कला पाटील, वैशाली बंगेरा, डॉ. स्मिता पाटील, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग शिंदे, वैद्यकीय अधिकारी एआरटी अलिबाग, डॉ. नालंदा पवनारकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, प्राचार्या नर्सिंग प्रशिक्षण केंद्र अलिबाग मोरे, जिल्हा पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक रश्मी सुंकले एम. अँड इ., संपदा मळेकर, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अर्चना जाधव, कल्पना गाडे,  अनिल खंडाळे, समुपदेशक सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, गणेश सुतार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार, वाहनचालक महेश घाडगे, किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील, संकेत घरत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply