संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन
सांगली : रामप्रहर वृत्त
डॉ. पतंगराव कदम यांनी स्वतः उच्च शिक्षण संस्था चालवली, पण ज्या ज्या वेळेला रयत संस्थेचा प्रश्न पुढे आला त्या वेळेला पतंगराव कधी मागे राहिले नाहीत. त्यांनी पहिल्यांदा ‘रयत’ला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगलीतील रामानंदनगर येथे केले तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका माध्यमातून घडले व त्यांनीही शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत केली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराने चालवलेली संस्था आहे. न मागता आपणहून मदत करायची ही त्यांची भूमिका आयुष्यभर विसरू शकत नाही, असे म्हटले.
या कार्यक्रमात मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या महाविद्यालयासाठी 50 लाख रुपयांची देगणी जाहीर केली. रामानंदनगर येथील आर्टस, सायन्स, अॅण्ड कॉमर्स या विद्यालयाचे नामकरण डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय करण्यात आले आहे. हा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार मोहन कदम, डॉ. विश्वजीत कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, डॉ. शिवाजीराव कदम, संघटक डॉ. अनिल पाटील, महेंद्र लाड, सचिव विकास देशमुख, मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य रामशेठ ठाकूर, जे.के. बापू जाधव, सरोज पाटील, रोहित पाटील, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला पाटील, विभागीय अध्यक्ष डॉ. एम.बी. शेख, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अजित पाटील, डॉ. रवींद्र पवार, विठ्ठल शिवणकर, विनायक संकपाळ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, बी.एन. पवार, डॉ. राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, अशोक शिंदे, उत्तम वाळवेकर, अँथोनी डिसोझा, बाळासाहेब पवार, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, विनायक पाटील, रामानंदनगरच्या सरपंच सारिका जाधव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रयतसेवक उपस्थित होते.
या वेळी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाला कर्हाड येथील सद्गुरू गाडगेबाबा महाराज महाविद्यालयातर्फे 50 लाख, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 लाख, डॉ. विश्वजित कदम यांनीही रयत शिक्षण संस्थेला दीड कोटी रुपयांचा निधी दिला तसेच रयत शिक्षणतर्फे 50 लाख रुपयांची देणगी अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर केली.