Breaking News

मी भाजप सोडणार नाही, बंडखोरी माझ्या रक्तात नाही!

पंकजा मुंडे यांची ठाम भूमिका

मुंबई : प्रतिनिधी

माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत, मात्र आता स्वत: पंकजा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, भाजप पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. पक्षावर दबाव टाकण्यासाठी मी हे करीत असल्याचा आरोप होत आहे, मात्र हेदेखील सत्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली, तर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पंकजा यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पंकजा पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. आता पंकजा यांनीच पक्षांतराबाबतच्या बातम्यांचे खंडन केले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply