Breaking News

रायगड वाहतूक पोलीस दलाला मिळाले बळ

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड पोलीस दलात चार इंटर सेफ्टर व्हेईकल दाखल झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविणार्‍या बेजबाबदार चालकांना आता स्पीड गनच्या कॅमेरात टिपले जाणार आहे, तसेच वाहनाच्या मालकाकडून दंड वसूल केला जाईल.

महामार्गावरील सुसाट वाहन चालविणार्‍यावर पोलिसांचे लक्ष राहावे यासाठी राज्य सरकारने राज्यात 92 इंटर सेफ्टर व्हेईकल वाहतूक पोलीस दलात दिलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातही चार इंटर सेफ्टर व्हेईकल दाखल झाल्या आहेत. या विशेष वाहनात स्पीड गनच्या कॅमेर्‍याद्वारे वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या चारचाकी, दुचाकी वाहनांचे फोटो काढले जातात. त्यानंतर वाहनचालक भरधावपणे निघून गेला, तरी वाहन मालकाला कारवाईचा संदेश मोबाईल गेलेला असतो. त्यामुळे वाहतूक पोलीस करवाईनुसार त्याला दंड आकारणी भरावी लागते. वाहनाला पूर्ण काळ्या काचा लावण्याबाबत शासनाने बंदी आणली असून, काळ्या काचा तपासणी यंत्रही या व्हेईकलमध्ये आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply