पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल येथील लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे नुकतीच पनवेल तालुक्यातील वळवली गावातील जिल्हा परिषद शाळेतील 167 तसेच कोलवाडी येथील संजयगांधी स्मारक हायस्कूलमधील 137 मुलांची अशी एकूण 305 मुलांची मोफत नेत्र तपासणी केली. यापैकी 40 मुलांना पुढील तपासणीसाठी पनवेल येथील लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्टमध्ये बोलविण्यात आले आहे. ग्रामीण तसेच शहरातील घराघरांमध्ये लहान मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर, चुकीची आहारपद्धती, नेत्रविकार तज्ज्ञांकडून नियमित न होणारी तपासणी यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते व पुढे डोळ्यांच्या तक्रारी वाढत जाऊन, तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा, अभ्यासात दुर्लक्ष अशा अनेक समस्या शालेय मुलांना भेडसावत आहेत, याच जाणीवेतून ही तपासणी करण्यात आली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्टचे नेत्ररोग तज्ज्ञ तसेच शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्ग यांनी भरपूर मेहनत घेतली.