Sunday , February 5 2023
Breaking News

ओवे येथे आजपासून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

खारघर ओवे गावातील हावमा एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 8 डिसेंबरदरम्यान आमदार चषक मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने खेळाडू आणि दर्शकांना पर्वणी उपलब्ध झाली आहे.

आमदार चषक मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धेमधील विजेत्या संघास दोन लाख रुपये, उपविजेत्या संघास एक लाख रुपये तर तृतीय आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यास प्रत्येकी 50 हजार रुपये, तसेच चषक प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे. या होणार्‍या स्पर्धेतील मालिकावीराला चार चाकी गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यातील उकृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना मोटरसायकल आणि एलइडी टीव्ही भेट म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने ओवे गावातील स्टार क्रिकेट मैदानात खेळविले जाणार आहेत. स्पर्धत विशेषतः प्रथम येणार्‍या ग्रामीण भागातील संघास प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहणार आहेत, असे हावमा एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल असोसिएशनचे पदाधिकारी मन्सूर पटेल यांनी सांगितले. आमदार चषक मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जहीर पटेल, सुहेल पटेल, निकेश म्हात्रे, सुनील भोईर, सोपान भोईर आणि सचिन ठाकूर मेहनत घेत आहेत. स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी 9930886060, 8828250432, 8898462323 या क्रमांकांवर संपर्क साधवा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply