Breaking News

पनवेलमध्ये मोफत मधुमेह मार्गदर्शन शिबिर

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल, नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिका व ब्रह्माकुमारीजमार्फत मोफत मधुमेह मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात  7 व 8 डिसेंबर रोजी हे शिबिर होणार आहे. 30 ते 60 वर्षे वयातील स्त्री पुरुषांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डायबिटीज फ्री-फिट इंडिया-हेल्दी इंडिया, अलविदा डायबिटीज कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. कीर्ती समुद्र व डॉ. शुभदा नील यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये मधुमेहाचे कारण, निवारण तसेच संपूर्ण नियंत्रण  या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. यासाठी खालील पत्त्यावर व क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी. प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय , आदित्य बिल्डिंग, फ्लाट नं 107, मिडल क्लास सोसायटी, पनवेल, संपर्क क्र. 022-27452618, नील हॉस्पिटल, सिडको ऑफिस समोर, नवीन पनवेल, सेक्टर 1 संपर्क क्र. डॉ. शुभदा नील 022-27467850/ 9892148155, डायबिटीज केअर क्लिनिक, श्रीयश हॉस्पिटल समोर सेक्टर 19, नविन पनवेल संपर्क क्र. डॉ कीर्ती समुद्र 022-27454069/70, निओ क्लिनिक, एमसीसीएच सोसायटी, शिवाजी चौक, पनवेल, संपर्क क्र. डॉ निलेश बाठीया 022-27460100 तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी ुुु.रर्श्रींळवरवळरलशींशी.लेा या वेबसाईटवर करावी.

शिबिराचे ठिकाण व वेळ फडके नाट्यगृह, पनवेल, शनिवार 7 डिसेंबर – सकाळी 9 ते सायंकाळी 5.30वाजेपर्यंत व  रविवार 8 डिसेंबर – सकाळी  9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply