उरण ः वार्ताहर
उरण येथून सोमवारी
(दि. 2) सकाळी 9 वाजता श्रींची आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाले असून श्रींची पालखी मंगळवारी (दि. 10) सकाळी 10 वाजता श्रीक्षेत्र पुण्यधाम
शिर्डी येथे पोहचणार आहे या वेळी पालखी उरण शहरातून निघाल्यावर पालखी दिंडीचे जागोजागी स्वागत झाले. या सोहळ्याला बाबांच्या पालखी व पादुकांचे भाविकांनी दर्शन घेतले. पालखी दिंडीच्या सांगतासमयी श्री साई भंडारा व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन शनिवारी (दि. 21) श्री रतनेश्वरी मंदिर जसखार येथे करण्यात आले आहे.