अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. 21) शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 234 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून मतमोजणी 19 जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना निकालासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रायगड जिल्ह्यात माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, पाली व खालापूर या सहा नगरपंचायतींमधील एकूण 79 जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. सर्व नगरपंचायतींमध्ये मतदारांनी शांततेत मतदान क्केले. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.83 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले. याची मतमोजणी व निकाल बुधवारी (दि. 22) आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …