Breaking News

श्री महंत स्वामी महाराजांचे भक्तगणांनी घेतले आशीर्वाद

नवी मुंबई ः वार्ताहर

श्री महंत स्वामी महाराज यांचे आगमन मोठ्या धार्मिक वातावरण नवी मुंबईतील नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाले. त्यांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भक्तगणांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, डॉ. डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉलेजचे संचालक डॉ. विजय पाटील, बी. आर. शेठी उपस्थित होते. बीएपीएस स्वामीनारायन संस्थेचे सहावे संध्याकालीन आध्यात्मक धर्मगुरू श्री महंत स्वामी महाराजांचे आगमन नेरूळ मध्ये झाले. प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्महोत्सवी सोहळ्याच्या अनुशंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परमपूज्य श्री महंत स्वामी यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या जगभरातील भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या ठिकाणचे वातावरण मोठे धार्मिक, शिस्तबद्ध होते. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून मुंबईतील स्वामीनारायण मंदिराच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात व्यसनमुक्ती, पालक जागृती अभियान, बालक-युवक जागृती आदी सेवाभावी उपक्रमांचे समावेश होता. तसेच बीएपीएस संस्थेशी जुळलेल्या बालक व युवकांच्या माध्यमातून सव्वा लाख घरांत संपर्क करून कौटुंबिक शांततेचा संदेश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या वेळी आत्मतृप्त स्वामी, अक्षरवत्सल स्वामी, आनंदस्वरूप स्वामी, ब्राम्हविहारी स्वामी, कोठारी भक्तिप्रिय स्वामी, ईश्वरचरण स्वामी आदींनी प्रमुख स्वामी महाराज यांच्या माध्यमातून नशामुक्ती, तणावमुक्ती, अश्रद्धा, अहंकार आणि विश्वास आदीबाबत देश-विदेशातील लाखो नागरिकांना आलेल्या अनुभवांची माहिती दिली. प्रमुख स्वामी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथाच्या तिसर्‍या भागाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणेश नाईक, आशिष शेलार, उरणचे आमदार महेश बादली, निरंजन डावखरे, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply