Breaking News

प्रवीण आमरेंचा दिल्लीला अलविदा!

विजय दहियाकडे नव्याने जबाबदारी

नवी दिल्ली ः वृत्तंसस्था

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज होताना दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या प्रशिक्षणवर्गात मोठे बदल केले आहेत. संघाच्या ढरश्रशपीं डर्लेीीं ऊर्शींशश्रेिाशपीं थळपसची जबाबदारी आता माजी यष्टीरक्षक विजय दहियाकडे आली आहे. प्रवीण आमरे यांनी आपल्या पदावरून पायउतार होणं पसंत केलं आहे. गेली पाच वर्षे आमरे दिल्ली संघासाठी नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सांभाळत होते.

आपण आतापर्यंत केलेल्या कामावर समाधानी असल्याचं आमरेंनी सांगितलं. आपल्या कारकिर्दीतील श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांसारख्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाल्याचं समाधान असल्याचंही आमरेंनी स्पष्ट केलं. मी विचार करून आणि सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला. माझ्या परिवाराला आता माझी गरज आहे. माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली होती ती पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे, असेही ते म्हणाले.

मध्यंतरी प्रवीण आमरेंनी भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, मात्र कपिल देव यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने विक्रम राठोड यांना आपली पसंती दिली. यामुळे आमरे नाराज असल्याचंही समजतं. यापुढे मला कोणी सांगितल्याशिवाय मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार नाही. आतापर्यंत मी तीन वेळा अर्ज केला, मात्र बीसीसीआयला आपली गरज नसल्यामुळे अर्ज करण्यात काहीच उपयोग नसल्याचं मला समजलं आहे, अशा शब्दांत आमरेंनी आपली नाराजी स्पष्ट केली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply