Breaking News

विहीर पडल्याने ऐेन पावसाळ्यात पाणीटंचाई

पोलादपुरातील खोपड गावातील महिलांची वणवण सुरू

पोलादपूर : प्रतिनिधी

अतिवृष्टीमध्ये खोपड (ता. पोलादपूर) गावातील विहीर पडल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील गोवले ग्रामपंचायत हद्दीतील खोपड गावातील एकमेव विहीर 29 जुलैला झालेल्या अतिवृष्टीत पूर्ण कोसळली असून, त्या विहिरीत असलेला विद्युत पंपही गाडला गेला आहे. विहिरीकडे जाणारी पायवाटही नष्ट झाल्याने महिलांना पाणी भरण्यासाठी सुमारे एक किलोमीटर अंतरावरील ओढ्यावर जावे लागत आहे. दरम्यान, संबधित खात्याच्या अभियंत्यांनी खोपड गावात जाऊन सर्वेक्षण केले असून कोसळलेल्या विहिरीच्या खालच्या बाजूला नवीन विहिरीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply