Breaking News

पोलिसांनो, तुम्हाला सलाम!, हैदराबाद इन्काऊंटवर सायनाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

हैदराबाद : वृत्तसंस्था

सध्या चर्चेत असलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी रात्री पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले.  भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने पोलिसांच्या या कृत्याला पाठिंबा दिला आहे. तुम्ही उत्तम काम केलंत. हैदराबाद पोलीस, तुम्हाला सलाम, असे ट्विट करीत तिने पोलिसांचे समर्थन केले.

बहुचर्चित प्रकरणातील चार आरोपींनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी त्या आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला, पण त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात चारही आरोपी ठार झाले. चारही आरोपी पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर बहुतांश लोकांनी या कृत्याचे समर्थन केले, तर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने मात्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

आता पुन्हा कोणी धाडस करणार नाही : हरभजन

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेदेखील पोलिसांची प्रशंसा केली. त्याचसोबत त्याने हैदराबाद सरकारचेही अभिनंदन केले. हैदराबाद सरकार आणि पोलीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांनी सार्‍यांना दाखवून दिले की हे असेच व्हायला हवे होते. आता पुन्हा कोणी असे करण्याचे धाडस करणार नाही, असे ट्विट हरभजनने केले. त्याचसोबत त्याने भारत सुरक्षित बनवा, असा टॅगदेखील दिला आहे. ओवे (ता. पनवेल) हावम एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब यांच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका अध्यक्ष व आयोजक मन्सूर पटेल, जिल्हा सरचिटणीस रय्यान तुंगेकर, नासीर शेख, इर्शाद शेख, जावेद पटेल, इम्तियाझ शेख, अफजल शेख, मुनाफ पटेल, निसार पटेल, मुश्ताक पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply