पनवेल ः रामप्रहर वृत्त
थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल येथे भव्य विज्ञान आविष्कार स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी (दि. 15) करण्यात आले होते. यामध्ये पनवेल व उरण विभागातील सुमारे 13 शाळांनी सहभाग नोंदविला.
‘प्रग्या 1.0 ः द पॉवर ऑफ इनोव्हेशन फॉर अ सस्टेनेबल फ्युचर’ या शीषर्काखाली घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन शकुंतला रामशेठ ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनात एआय आधुनिक तंत्रज्ञान व विविध विषयांवर वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. त्याचप्रमाणे पुरातन विषयांमध्ये ऐतिहासिक रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी, तलवारी भाले तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभाग यांची सांगड घालत दर्जेदार प्रयोग मांडण्यात आले होते.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख मान्यवर म्हणून सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूलचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, स्थानिक स्कूल कमिटी मेंबर कविता खारकर, निलेश खारकर, धीरज ओवळेकर तसेच ‘रयत’चे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, पीआरओ बाळासाहेब कारंडे, डी.सी. पाटील, लिपिक संतोष गुजर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, परीक्षक अनिल कौशिक, चेतन कौशिक आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रदर्शनातील प्रयोगांचे कौतुक करत छोट्या शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळा बांधणार असल्याचे आश्वासित केले, तर स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर यांनी, भविष्यामध्ये प्रग्या 1.0चे 2.0, 3.0 होत जाओ, अशा शुभेच्छा दिल्या.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper