Tuesday , February 7 2023

आगरी कोळी कराडी महोत्सवाचे परेश ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल मधील गुजराती शाळेच्या मैदानात दक्षराज सामाजिक मित्रमंडळ करंजाडे यांच्यावतीने ‘आगरी कोळी कराडी महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला आहे. 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा महोत्सव सुरु राहणार असून, नागरीकांना विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकुर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक राजु सोनी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, अजय साबळे, अर्जुन साबळे, आनेश साबळे, किरण साबळे, सागर आंग्रे, संतोष विखारे, बळीराम म्हात्रे, नंदकुमार भोईर, अमोल साबळे, अजित साबळे, अमोल गोवारी, सर्वेश पवार यांच्यासह पदाधिकारी, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘विठ्ठला’ हा अभंगवाणीचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply