Wednesday , February 8 2023
Breaking News

मान्यवरांकडून भीमरायाला वंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंर्तगत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार प्रशांत ठाकूर  व आमदार महेश बालदी यांनी अभिवादन केले.

या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक विकास घरत, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव, भाजपचे महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, अशोक पाटील, युवानेते पवन सोनी, उसर्लीचे उपसरपंच गणेश भगत आदी उपस्थित होते.

दरम्यान रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभेस अनेक भिमअनुयायींनी उपस्थित राहून डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

या वेळी महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा नगरसेवक जगदिश गायकवाड, नगरसेविका विद्याताई गायकवाड, किशोर गायकवाड, राज सदावर्ते यांच्यासह असंख्य भिमअयुयायींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करत अभिवादन केले. या वेळी आमदार प्रशांत ठाकुर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पक्ष कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शुक्रवारी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, गुळसूंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सिताराम काथारा, विश्वास काथारा, अनंता काथारा, अशोक अांबेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply