Monday , February 6 2023

मुरूडमध्ये एड्स जनजागृती रॅली

मुरूड : प्रतिनिधी

येथील ग्रामीण रुग्णालय आणि नूतन नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड शहरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सारा डोंगरकर यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. रॅलीतील विद्यार्थ्यांनी एचआयव्ही, एड्सबद्दल जोरदार घोषणाबाजी देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या जनजागृती रॅलीदरम्यान कल्याणी दवाखान्यासमोर आणि मच्छीमार्केटमध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली. एचआयव्ही, एड्स म्हणजे काय, तो कोणकोणत्या कारणाने होतो, तो आजार होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तसेच जवळच्या सर्व सरकारी दवाखान्यांत एचआयव्हीची मोफत तपासणी करून त्याचा अहवाल गोपनीय ठेवला जातो याबद्दल या पथनाट्यातून जमलेल्या लोकांना उपयुक्त माहिती देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे सचिन जाधव यांनीही एचआयव्ही, एड्सबद्दल मार्गदर्शन केले.  या जनजागृती रॅलीत ग्रामीण रुग्णालयाचे सुरज पवार, सुहास सानप, समीर धांडुरे, सुभाष हुरदुके, प्रसाद सुर्वे, नर्सिंग स्कूलचे सागर माळी यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.

Check Also

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …

Leave a Reply