नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2018-19 वर्षाकरिता आपल्या खेळाडूंसाठी वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ए+, ए, बी आणि सी असे चार प्रकार करण्यात आले असून, ए+ प्रकारात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंनाच जागा देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या शिखर धवनचे करार यादीतील स्थान घसरले आहे. ए+मधून शिखर धवनला ए प्रकारात स्थान देण्यात आले आहे. त्याचवेळी 2018 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात चमकदार कामगिरी करणार्या ऋषभ पंतला ए प्रकारात बढती देण्यात आली आहे.
- श्रेणीनिहाय मिळणारे मानधन
ए+ : 7 कोटी, ए : 5 कोटी, बी : 3 कोटी, सी : 1 कोटी
- ए+ श्रेणीतले खेळाडू : विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा
- ए श्रेणीतले खेळाडू : रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत
- बी श्रेणीतले खेळाडू : लोकेश राहुल, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या
- सी श्रेणीतले खेळाडू : केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, मनीष पांडे, हनुमा विहारी, खलिल अहमद, वृद्धीमान साहा