Saturday , June 3 2023
Breaking News

डब्ल्यूडब्लूईसाठी 80 खेळाडूंची निवड

मुंबई : प्रतिनिधी

डब्ल्यूडब्लूईच्या भारतातील पहिल्यावहिल्या ट्रायआऊट्स अर्थात खेळाडू निवडीचे आयोजन मुंबईच्या नेस्को येथे तयार केलेल्या खास रिंगणामध्ये नुकतेच करण्यात आले होते. भारतभरात तुफान लोकप्रिय असणार्‍या या करमणूक प्रधान खेळासाठी तब्बल 60 पुरुष आणि 20 महिलांची अंतिम पात्रता फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धकांच्या उपस्थितीत या वेळी दोन शो सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. एरवी फक्त टीव्हीवर पाहायला मिळणारे डब्ल्यूडब्लूईचे दोन सामने स्पर्धकांना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळाली. कविता देवी विरुद्ध जिनी संधू आणि रिंकू सिंग, सौरव गुर्जर विरुद्ध जीत रामा असे एनएक्सटी टॅलेंट टीममधील 2 सामने खेळवण्यात आले. पाच वेळा डब्ल्यूडब्लूई टॅग टीमचा मान मिळवलेल्या द न्यू डे या टीममधील कोफी किंग्जटन, बिग ई आणि झेवियर वूड्स हेही या स्पर्धकांना उत्तेजन देण्यासाठी व ट्रायआऊट्समध्ये त्यांची कामगिरी पाहण्यासाठी भारत दौर्‍यावर आले होते.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply