खारघर : इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ सायन्स 2018-2019च्या स्पर्धा परीक्षा नुकत्याच रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे घेण्यात आल्या होत्या. ऑलिम्पियाड टॉप रँक आय. एस. ओ-18 स्पर्धा परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी कृष्णा विजय अत्तरे (इ. 8वी) याने सहभाग घेत प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेचे पारितोषिक, सुवर्णपदक, रोख रक्कम रु. 5000, सिल्व्हर झोनचे स्पेशल पेन व आकर्षक ट्रॉफी मिळविली, तसेच त्याला ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.
