मोहोपाडा ः वार्ताहर
डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिवली येथे स्माईल फाऊंडेशन व आयडीमीतसू कंपनी पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने 8वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 350 मुलींचे व मुलांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब, दंतचिकित्सा, डोळे तपासणी व सामान्य आरोग्य तपासणी डॉ. हर्षदा सरोदे, डॉ. नामदेव लहामटे, डॉ. लेखा उचील या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केली व विविध प्रकारच्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.