कर्जत : बातमीदार
तालुक्यातील क्रांतिकारक यांच्या जीवनावरील दिवंगत माजी सरपंच प्रवीण पाटील निर्मित स्वरजाई आर्ट मीडिया प्रोडक्शनच्या ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाला एमआयएफएफमध्ये पाच (अवार्ड) पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई अंधेरी येथील मेयर ऑडिटोरीयममध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात आला होता. त्याला अनेक दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ, उपस्थित होते. ‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, गीतकार एकनाथ देसले यांनी चित्रपटासंदर्भात महोत्सवात माहिती दिली. या महोत्सवात सर्वात जास्त पुरस्कार मिळवून ‘शहीद भाई कोतवाल‘ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार निर्माते प्रविण पाटील यांच्या पत्नी मानसी पाटील यांनी स्वीकारला.
मिळालेले पुरस्कार
सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट
निर्माता – प्रविण पाटील, सागर हिंदुराव, सिध्देश
दिग्दर्शन – एकनाथ देसले आणि पराग सावंत
सर्वोत्कृष्ट डिओपी- तुषार विभुते,
कला दिग्दर्शन – देवदास भंडारे,
सर्वोत्कृष्ट डिआय – वैभव वामन