Tuesday , February 7 2023

श्रीदत्त जयंतीनिमित्त उरणमध्ये यात्रा

उरण ः वार्ताहर

श्रीदत्त जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. 11) उरणमधील श्रीदत्त मंदिरात उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी युवक मंडळ यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देऊळवाडी येथील दत्त मंदिर येथे करण्यात आले आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. उरण शहरातील देऊळवाडी येथील दत्त मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येतात. या यात्रेमध्ये फूलवाले, मिठाई, विविध प्रकारची खेळणी, महिलांसाठी सौंदर्यप्रसाधन, छोट्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, कपडे, स्वेटर, पेढे आदींची दुकाने थाटण्यात आलेली असतात. तसेच या यात्रेसाठी नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठलराव दामगुडे व उरण पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply