Breaking News

बॉक्सर अमित पंघल फायनलमध्ये

एकतरिनबर्ग (रशिया) ः वृत्तसंस्था

 भारताचा बॉक्सरपटू अमित पंघलने शुक्रवारी (दि. 20) इतिहास रचला. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्यात कझाकस्तानच्या साकेन बिबोसिनोवचा 3-2 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली; तर दुसरीकडे भारताच्या मनीष कुमारला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

भारताच्या अमित पंघल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) यांनी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले होते. दोन्ही बॉक्सरचे हे जागतिक स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले आहे. अमित पंघलने कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक मिळवले होते. पंघलने कझाकच्या बॉक्सरचा पराभव केला. यासह त्याने फायनलमध्ये धडक मारली असून, फायनलमध्ये त्याचा सामना उझ्बेकिस्तानच्या शाखोबद्दीन जोइरोव सोबत होणार आहे. जोइरोव हा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. जोइरोवने फ्रान्सच्या बिलाल बेनामाचा 5-0 असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply