Breaking News

गरजू महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षण

पनवेल ः प्रतिनिधी  

अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे रिक्षा व्यवसाय करण्यासाठी इच्छूक महिलांना नवीन पनवेल येथे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे इच्छूक गरीब महिलांसाठी बॅच, लायसन्स व रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातच हे प्रशिक्षण सुरु होणार असल्याची माहिती अध्यक्ष संस्थापक संतोष भगत यांनी दिली.

महागाईमुळे कुटूंब चालवताना महिलांना कसरत करावी लागते. त्यामुळे आपणही काहीतरी व्यवसाय करावा अशी इच्छा महिलांमध्ये असते.परंतु व्यवसाय करण्यासाठी भांडवल तसेच मार्गदर्शन मिळत नसल्याने इच्छा असूनही त्या व्यवसाय करु शकत नाहीत. अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे भांडवला अभावी व्यवसाय करु न शकणार्‍या महिलांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी सांगितले. पनवेल प्रादेशिक परिवहन उप अधिकारी हेमांगीनी  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होत आहे

रिक्षा व्यवसाय करण्यासाठी बॅच, लायसन्स व रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे इच्छूक गरीब महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण मोफत

देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातच हे प्रशिक्षण सुरु होणार असल्याची माहिती अध्यक्ष संस्थापक संतोष भगत तसेच उपाध्यक्ष शालिनी गुरव, सचिव विलास मोरे, खजिनदार ललिता राऊत यांनी दिली. अधिक माहितीसाठी संतोष भगत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply