नवी मुंबई ः सिडको सेवा
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेल्या
निर्देशांनुसार नागरिकांना सिडकोशी संबंधित त्यांचे प्रश्न, समस्या यांच्या निवारणाकरिता सिडकोच्या संबंधित विभाग प्रमुखांना दर सोमवारी, सार्वजनिक सुट्ट्या वगळता, दुपारी 2 ते 3 या वेळेत भेटता येणार आहे. याकरिता अभ्यागतांना (व्हिजिटर) पूर्व वेळ (अपॉईन्टमेन्ट) घेण्याची आवश्यकता नाही.
नागरिकांना नागरी, मालमत्ता विषयक समस्या, तक्रारी, प्रश्न आदींच्या निवारणासाठी, त्यांच्या समस्या किंवा प्रश्न मांडण्यासाठी विभाग प्रमुखांना भेटणे गरजेचे असल्यास उपरोक्त दिवशी व वेळेत भेटता येणार आहे. नागरिकांना अधिकार्यांशी थेट संवाद साधता येऊन त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण व्हावे तसेच पारदर्शकता निर्माण होऊन सिडको व नवी मुंबईतील नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.