Breaking News

सुकापूर फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नारायण नागू पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सुकापूर येथे सुकापूर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या हस्ते रविवारी (दि.8) करण्यात आले.

सुकापुर फेस्टिव्हल 8 ते 15 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, दत्ता भगत, पांडुरंग केणी, नामदेव फडके, अनिल पोपेटा, योगिता पोपेटा, कविता पोपेटा, बुवा भगत,

वामन शेळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply