

खांदेश्वर ः येथील सर्कस मैदानावर खालसा साजना दिवस समर्पित 550चा गुरुनानक देव जी प्रकाश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी नगरसेवक विकास घरत, युवा नेते हॅपी सिंग, हरिचंद्र सिंग, चंदोक सिंग, राज सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.