Breaking News

बांगलादेशी नागरिकाची गंभीर दखल

पोलिसांनी शासकीय कार्यालयांकडून मागवली माहिती

पनवेल : बातमीदार

चिखले येथे बेकायदेशीररित्या नाव बदलून वास्तव्य करणार्‍या एका बांगलादेशी नागरिकाला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांमुळे येथील शासकीय कारभार चव्हाट्यावर आला आहे. पनवेलमध्ये बोगस कागदपत्रे बनवून कोणालाही शासकीय दाखले मिळू शकतात हे पुन्हा एकदा समोर झाले आहे. पोलिसांनी शासकीय कार्यालयांना पत्र पाठवून याबाबतची माहिती मागवली आहे. चिखले येथून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशीची तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपीला मदत करणार्‍यांवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत इंटेलिजन्स ब्युरो याबाबत अधिक तपास करीत आहे. दरम्यान, या बांगलादेशीकडे मिळून आलेल्या कागदपत्रांबाबत तालुका पोलिसांनी शासकीय कार्यालयांना पत्रे पाठवून त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. नोव्हेंबर महिन्यात चिखले गावातून पोलिसांनी मनोहर राहू पवार या खोट्या नावाने वास्तव्य करणार्‍या ईनामूल उमर मुल्ला या बांगलादेशी नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडे बोगस नावाने रेशनकार्ड, लायसन्स, आधार कार्ड, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय, अधिवास याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र अशी सर्व कागदपत्रे सापडून आली. ही कागदपत्रे त्याच्याकडे कशी आली व कोणी बनवून दिली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याच्याकडे दोन मोबाइलदेखील आढळले आहेत. ईनामूल मुल्ला याने 2013मध्ये रेशनकार्ड, 2015मध्ये लायसन्स, 2017मध्ये शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला, वय, अधिवास दाखला, वास्तव्याचा दाखला बनवल्याची माहिती पुढे आली आहे. या गंभीर प्रकाराची यंत्रणांनी गंभीर दखल घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply