Breaking News

कळंबोली हायवेवरून मुलीचे अपहरण

पनवेल : बातमीदार

कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील ब्रिजखाली पुणे-मुंबई हायवेवरून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण केले असल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कळंबोली माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात ही 14 वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे. 6 डिसेंबर रोजी तिच्या मैत्रिणीने तिला कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील ब्रिजवर सोडले, मात्र ती घरी न गेल्याने अज्ञात इसमाने तिचे अपहरण केले असल्याचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तिचा वर्ण सावळा, बांधा सडपातळ, उंची पाच फूट दोन इंच,  चेहरा गोल, केस लांब असून, अंगात पांढर्‍या रंगाचा शर्ट, त्यावर चॉकलेटी रंगाचे चेक्सचे टॉप, चॉकलेटी रंगाचीच सलवार व ओढणी असे शाळेचे कपडे तिने घातले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply