Breaking News

पत्रकारांसाठी पेण येथे गुरुवारी कार्यशाळा

अलिबाग : प्रतिनिधी

पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने गुरुवारी (दि. 26) पेण येथे पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पेण-खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्यवन इंटरनॅशनल येथे होणार्‍या या कार्यशाळेचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. केंद्र शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसारमाध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ पत्रकार विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधतील. पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले या विभागाच्या कार्याबद्दल उपस्थितांना विस्तृत माहिती देतील. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, प्रसाद केरकर, ओमकार दाभाडकर, कोकण विभाग माहिती व जनसंपर्क उपसंचालक डॉ. गणेश मुळे, पत्र सूचना कार्यालयाच्या भावना गोखले हे या वेळी  उपस्थित पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधतील. रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply