Breaking News

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही बुधवारी (दि. 11) मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 117 मते, तर विरोधात 92 मते पडली. हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही हे विधेयक मांडले. या विधेयकावर सहा तासांहून अधिक वेळ चर्चा केल्यानंतर रात्री आठनंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. आधी चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यासाठी मतदान घेण्यात आले. बहुमताने ही मागणी फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर विधेयकांवरील 14 सूचनांवर मतदान घेण्यात आले आणि सरतेशेवटी विधेयकावर अंतिम मतदान झाले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply