नगरसेविका संजना कदम यांच्या मागणीला यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघरमधील रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झाली असून या कामासंदर्भात नगरसेविका संजना समीर कदम यांनी खारघरच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर व सिडको अधिकारी तसेच खारघर येथील सर्व नगरसेवक यांच्या बैठकीत खारघरमधील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक 6च्या नगरसेविका संजना समीर कदम यांनी त्यावेळी सेक्टर 16, 17, 18 येथील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत रस्ते डांबरीकरण कामास सुरुवात करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचनेनुसार खारघर प्रभाग क्रमांक 6मधील रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झाली. सेक्टर 18मधील स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून डांबरीकरण कामाची सुरुवात झाली. या वेळी कामाची पाहणी करताना समीर कदम, रायगड जिल्हा सरचिटणीस तथा भाजपा युवा मोर्चा सुशांत पाटोळे, जयेश माने, राजू अचलकर, उदय पाटील आदी उपस्थित होते.