Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने कळंबोली-कामोठे सर्व्हिस रोडवरील पथदिवे उजळले

स्त्री शक्ती फाऊंडेशनचा पाठपुरावा

पनवेल ः वार्ताहर

कळंबोली-कामोठे सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूला असलेले पथदिवे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे त्या ठिकाणाहून ये-जा करताना रात्रीच्या वेळी महिलावर्गाला त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याचप्रमाणे येथे चोरी, लुटमार आदी घटनासुद्धा घडल्या होत्या. यासंदर्भात स्त्री शक्ती फाऊंडेशनने संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्याचप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने नुकतेच या ठिकाणी बंद असलेले पथदिवे पुन्हा उजळले आहेत.

स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा विजया कदम यांनी यासंदर्भात पीडब्ल्यूडी ठाणे यांच्याकडे पाठपुरावा करून या दिवेे बंदसंदर्भात तक्रार केली. कळंबोली तसेच पनवेल महानगरपालिका यांच्याकडेसुद्धा यासाठी पाठपुरावा करून महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख तसेच महापौर डॉ. कविता चौतमोल यांचीसुद्धा भेट घेऊन त्यांना सद्यस्थिती पटवून दिली व त्यांना या नागरी समस्येकडे लक्ष घालण्यास सांगितले. त्याचप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांनासुद्धा याबाबतचे निवेदन दिले. यात त्यांना कळंबोली शहराध्यक्ष रवि पाटील यांचे सहकार्य लाभले. अखेरीस या भागातील विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून रात्रीच्या वेळी पथदिवे पुन्हा उजळल्याने या परिसरातून ये-जा करणार्‍या महिलावर्गाने स्त्री शक्ती फाऊंडेशन व आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply