Tuesday , February 7 2023

डीएनएस बँकेचा नवीन वास्तूत शुभारंभ

पनवेल ः वार्ताहर

डोंबिवली नागरी सहकारी बँक (डीएनएस) पनवेल शहरात गेली 10 वर्षे कार्यरत आहे. या कालावधीत नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच बँकेचा व्यवसाय उत्तम प्रकारे वाढण्यासमदत झाली आहे. बँकेची पनवेल शाखा आता आधुनिक सोयीसुविधांयुक्त (एटीएम किंवा ई-लॉबीसह) अशा तळमजल्यावरील वास्तूत स्थलांतरित होत आहे. त्यानिमित्त बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ. ची माहिती तसेच नागरिकांशी संवाद साधावा या हेतूने शाखेचा सभासद व ग्राहक मेळावा आयोजित केला आहे. रविवारी (दि. 15) सकाळी 10.30 वाजता हा मेळावा योजिला आहे. या कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक व व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष उदय कर्वे, शाखा व्यवस्थापक संध्या सामंत, सरव्यवस्थापक गोपाळ परांजपे, पालक संचालक मिलिंद आरोलकर यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply